॥ विचारवेध ॥
- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासकरंगारी ...
शाळा आणि शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया ... जशी मुलांची तशी शिक्षकांचीही .. प्राथमिक शाळेत तर शिक्षकाला अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात . म्हणजे अगदी शिपायापासून ते शिक्षकापर्यंत , एवढचं नव्हे तर गावचा मार्गदर्शक कणा म्हणूनही ठाम भूमिका घ्यावी लागते . ...
खरं तरं याचा धांडोळा घेण्याचे कारण म्हणजे शाळा तंबाखू मुक्त करायची ... प्रशासनाचा तसा सज्जड आदेश . मग काय शिक्षक लागले कामाला ... अकरा निकष पूर्ण करायचे म्हणूनची धडपड... ( खरं तर शाळेतील शिक्षक तंबाखू खात नाही ना मुले खात नाहीत मग शाळा तंबाखू मुक्त असताना ती आणखी कशी करावी अन् याचा अट्टाहास का ? तसं पाहिलं तर ही मोहीम तंबाखू मुक्त ग्राम म्हणून राबायला हवी . असो ही बाब अलाहिदा ! )
आमच्या शाळेतही अशीच तयारी पण ' माझी शाळा , तंबाखू मुक्त शाळा ' असा बोर्ड असणे अनिवार्य होतं . मग काय अनेक शिक्षकांनी आपापल्या शाळेत रंग आणि ब्रश हाती घेऊन तेही काम फत्ते केले .
मलाही तसच करावं लागलं . एक रंगारी शिक्षक म्हणून आज अनुभव घ्यावा लागला . यातुन नवं शिकता आलं ही बाब चांगलीच . पण पेनाने कागदावर अक्षरे लिहणं आणि ब्रशने भिंतीवर लिहणे यात जमीन आस्मानाचा फरक . नव्हे मोठं दिव्यच. रंग , ब्रश व इतर साहित्य उपलब्ध केले पण तशी अंगात कला हवी तरच ते जमणार ... पण दशकापूर्वी केलेल्या कामाचा अनुभव पाठीशी होता .. आता सरावात खंड असल्याने कामापुरतं वेडवाकडं कसंतरी ते पूर्ण केले . अन् वेगळया कामाचा आनंद वाटला . माझ्यातला रंगारी अजून जिवंत आहे याची पुन्हा एकदा अनुभूती आली .